नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था

नांदेड : नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गाची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली आहे. या मार्गावरून जाताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन जावं लागत आहे. तीर्थक्षेत्र माळेगावची यात्रा अवघ्या काही दिवसांवर आली आहे.

यात्रेसाठी राज्यभरातून भाविक येतात. यामुळे दर्शनासाठी माळेगावकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढते. तरीही बांधकाम विभागाने अद्याप खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलेलं नाही.

राष्ट्रीय महामार्ग 361 या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी केंद्र शासनानं मोठा निधी दिला आहे. या कामाची निविदा निघून दोन वर्ष झाली आहेत. तरीही कामाला सुरुवात झालेली नाही. चौपादरीकरणासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने खोदकाम करण्यात आलं आहे.

तर रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे अपघातात वाढ झाली आहे. या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत.

तीर्थक्षेत्र माळेगावच्या यात्रेआधी खड्डे बुजवा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Exit mobile version