Jaimaharashtra news

शहर वाहतुकीची बस चोरून विकणारी टोळी जेरबंद

कार चोरी करणाऱ्या टोळक्यांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. मात्र नांदेडमध्ये बस चोरणाऱ्या एका टोळक्याला अटक करण्यात आली आहे. ही टोळी हैदराबाद येथील शहर बसवाहतूक सेवेतील बस चोरून त्या बसचे स्पेअर पार्ट विकत होती.

सांगडातेलंगणा परिवहन महामंडळाची बस (क्र. टीएस 11 झेड 6254) दोन दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. याप्रकरणी बुधवारी तेलंगणातील अफजलगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरीमागे फारुख आठन्ना!

बस चोरीनंतर तेलंगणा पोलिसांचे एक खास पथक बस शोधण्यासाठी नेमण्यात आलं.

या शोधपथकाला ही बस नांदेड परिसरात असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार तेलंगणा पालिसांनी स्थानिक पोलिसांना बस चोरीची माहिती दिली.

स्थानिक पोलिसांनी आपले सूत्रं हलवल्यावर काकांडी परिसरात गुन्हेगारी विश्वातील कुख्यात फारुख आठान्ना याच्या फार्म हाऊसवर धाड घातली.

त्याठिकाणी बसचा सांगाडाच मिळाला.

चोरून आणलेल्या तेलंगणातील बसचे सर्व स्पेयर पार्ट वेगवेगळे करून बसचा केवळ सांगाडाच त्याठिकाणी शिल्लक होता.

बस चोरून तिचे स्पेयर पार्ट विक्री करण्याचा चोरट्यांचा हेतू स्पष्ट झाला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी फारुख आठन्नासह 5 जणांना अटक केली. पाचही आरोपींना तेलंगणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय.

Exit mobile version