जनजागृतीसाठी शिक्षक बनले बहुरुपी

नंदुरबार: शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनजागृती करण्यासाठी नंदुरबारमधील एक शिक्षक चक्क बहुरुपी बनले असून कधी वासुदेव, तर कधी भगवान शंकर, तर कधी पोलीस कर्मचारी होऊन गावात लसीकरणाबाबत प्रबोधन करत आहेत.

नंदुरबारमधील शहादा तालुक्यातील बिलाडी गावातल्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सचिन पत्की असे या शिक्षकाचे नाव असून ते बिलाडी आणि बामखेडा या दोन गावांमध्ये प्रबोधन करत आहेत.

आदिवासी भागातील, तसेच ग्रामीण भागातील लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करण्याची जबाबदारी ही त्या त्या गावातील शिक्षकांवर टाकण्यात आली आहे. कधी वासुदेव, कधी शंकर, तर कधी पोलीस अधिकारी अशा पात्रांमधून चौकाचौकात जात सचिन पत्की हे कोरोणा लसीकरणाबाबत गावकऱयांचे प्रबोधन करत आहे.

Exit mobile version