नागपूर पोलिसांचं ‘हे’ भन्नाट Tweet, सोशल मीडियावर ठरतंय सुपरहिट!

सध्या सर्वत्र दोनच गोष्टींची जोरदार चर्चा सुरू आहे. एक म्हणजे चंद्रयान 2 मिशनमधील विक्रम लँडरची आणि दुसरी म्हणजे जबर दंड आकारण्यास सुरूवात केलेल्या वाहतुकीच्या नियमांची… याच पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी केलेलं एक Tweet मात्र जबरदस्त हिट झालंय.


‘प्रिय विक्रम, कृपया प्रतिसाद दे. तू सिग्नल तोडला तरी आम्ही चालन फाडणार नाही’, असे ट्विट करत नागपूर शहर पोलिसांनी साऱ्या देशात हास्याचं कारंजं उडवलंय.

नागपूर पोलिसांचं हे Tweet आजवरचं सगळ्यात हिट ट्विट ठरलंय.

सोमवारी विक्रम लॅण्डरचा ठावठिकाणा लागल्याचे इस्रोकडून जाहीर करण्यात आलं आणि आनंदाला उधाण आलं. आता केवळ विक्रमने प्रतिसाद द्यावा, अशी प्रार्थना सगळेच देशवासी करीत आहेत. त्याचवेळी नागपूर पोलिसांनी विक्रम लॅण्डरबाबत हे ट्विट केलं.

पोलिसांच्या या विनोदबुद्धीचं सोशल मीडिया (Social Media) वर खूप कौतुक होतंय.

अनेक युजर्सनी Retweet केलंय, तर अनेकांनी रिप्लाय करून हे Tweet अफलातून असल्याचं म्हटलंय.

‘नागपूर पोलिस अगदी बरोबर बोलले. ‘विक्रम’कडून 133 कोटी भारतीयांना आशा आहे. नागपूर पोलिसांचे ट्विट अफलातून आहे’, असं एका यूजरने म्हटलंय.

‘मला माहीत आहे की नागपूर पोलिस सध्या चंद्रावरच आहेत’, असे दुसऱ्या एका यूजरने म्हटलंय.

तर ‘ग्रेट सेन्स ऑफ ह्युमर’ अशा शब्दांत एका यूजरने नागपूर पोलिसांचं कौतुक केलंय.

एका यूजरने ‘काश हमरो बिहार पुलिस आइसन होता… कोई रिस्पॉन्ड ही ना देता हैं’ या शब्दात नागपूर पोलिसांची बिहार पोलिसांशी तुलना करून नागपूर पोलिस उत्तम असल्याचं प्रमाणपत्र दिलंय.

पण अनेक युजर्सनी धमाल प्रतिक्रिया देऊन पोलिसांची कौतुक केलंय.

Exit mobile version