Fri. Jun 21st, 2019

दिवाळीसणाचा आजचा तिसरा दिवस ‘नरकचतुर्दशी’

0Shares

आज ‘नरकचतुर्दशी’…दिवाळीचा पहिला दिवस असला तरी वसुबारसेपासून सुरू झालेल्या दिवाळीसणाचा आजचा तिसरा दिवस…

नरकासूर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असं नाव पडलं. तर उटणं लावून आंघोळ झाल्यावर तुळशीपाशी पायाच्या अंगठ्याने कारीट फोडण्याची प्रथा आहे.

या दिवशी कणकवलीमध्ये भव्य नरकासुर स्पर्धा आयोजित करण्यात येते आणि नरकासुराचे वध करण्यात येते.

आजच्या दिवसाची कथा

पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा – म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासूरनावाचा एक राजा होता. ज्याने सोळा हजार 108 स्त्रियांना आपल्या बंदिस्त केले होते. हा नरकासूर प्रजेचाही खूप छळ करत असे, असे सांगतात. भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध केला तो दिवस होता अश्विन कृष्ण चतुर्दशीचा. नरकासुराचा वध करून सर्व स्रियांची भगवंताने मुक्तता केली. नरकासुराने भगवंताकडे शेवटी एक वर मागितला की, आजच्या तिथीला पहाटे चंद्रोदयाचे वेळी जो मंगलस्नान करेल, त्याला नरकाची पीडा होऊ नये म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे चंद्रोदयाच्या सुमारास अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले जाते.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: