Sat. Nov 27th, 2021

सुशांत प्रकरणी नारायण राणेंचा गौप्यस्फोट

सुशांतसिंह राजपूत खुनाप्रकरणी भाजप नेते नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

नारायण राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, सुशांत सिंग आणि दिशा सालिआन यांच्या कथित आत्महत्या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू आहे, पण उद्धव ठाकरे सत्तेचा गैरवापर करून आपल्या मुलाला क्लीन चिट देण्यात गुंतले आहेत. 

अभिनेते सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरेचा सहभाग असल्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी सोमवारी सांगितले.

उद्धव यांचा दसरा मेळावा फक्त आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट देण्यासाठी होता. रविवारी दसरा मेळाव्यात सुशांतसिंग प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी मौन तोडत म्हणाले की, बिहारच्या मुलाच्या न्यायासाठी लोकांनी माझा मुलगा आणि मुंबई पोलिसांसह महाराष्ट्रला बदनाम करण्याचा प्रयत्न केला.

यासंदर्भात पत्रकार परिषदेत राणे म्हणाले, लवकरच सुशांत सिंहची हत्या कोणी केली आणि दिशा सालियानवर बलात्कार कोणी केला हे सत्य समोर येईल. मोदी निवडून आल्यानंतरच शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत. राणेे यांंनी उद्धव ठाकरेंना मराठाविरोधी म्हणून संबोधले आणि म्हणाले डीजीपी, जीएसटी आणि अर्थसंकल्पाविषयी उद्धव ठाकरेंना काहीच माहिती नाही. ते बेईमानी करून मुख्यमंत्री झाले आहेत. राणे यांनी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना जेस्टर म्हणून त्यांची चेष्टा केली तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासाठी फिट नाहीत. असंं यावेळी म्हटलंं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *