Wed. Aug 10th, 2022

नारायण राणेंचा सरकारवर ‘प्रहार’

भाजपचे खासदार नारायण राणेंनी आज मुंबईत भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. भाजप प्रवेशानंतर ते पहिल्यांदाच भाजप कार्यालयात आले होते.

या पत्रकार परिषदेत राणेंनी ठाकरे सरकार आणि संजय राऊतांवर घणाघात केला.

सरकारचं अस्तित्व जाणवतं नाही

महाराष्ट्रात सत्तांतर झालं. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार आहे म्हणतात, पण सरकारचं अस्तित्व जाणवत नसल्याचं नारायण राणे म्हणाले.

दीड महिने उलटले. लोकहिताच्या दृष्टीने एकही कॅबिनेटचा निर्णय झाला नाही.

कर्जमाफी दिल्याची केवळ घोषणा केली आहे. कर्जमाफीचा जीआर काढला आहे. पण त्यावर अंमलबजावणीची तारीख नाही, त्यामुळे तो कायदेशीर जीआर नसल्याचं राणे म्हणाले.

राज्यात अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नावर सरकार चर्चा करत नाही. लोकहिताचा कोणताही निर्णय होत नाही, केवळ घोषणा होते.

आठवडेबाजार मंत्रिमंडळ

आजही मंत्री मंत्रालयात येत नाहीत. आठवडी बाजाराप्रमाणे कॅबिनेट बैठकीच्या दिवशी मंत्री मंत्रालयात येतात. संध्याकाळी निघून जातात, असा घणाघात राणेंनी सरकारवर केला.

बेकारीवर उपाययोजना नाही

राज्य अधोगतीकडे चाललंय, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची चिंता नारायण राणेंनी व्यक्त केली.

राज्यात बेकारीचे प्रमाण वाढत आहे. यावर उपाययोजना होत नाहीयेत.

विकास कामं चालू ठेवण्याऐवजी त्यांना स्थिगिती दिली जात आहे.

कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक साडे चार चालते. कॅबिनेटची बैठकीत राज्यातील जनतेला नवं काही देण्यासाठी चर्चा होत नाही.

राऊतांची चौकशीची मागणी

बुधवारी एका मुलाखतीत संजय राऊत यांनी दाऊद सोबत बोललो होतो, दम भरला होता. असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला होता.

यामुळे संजय राऊत यांची गृहखात्याने चौकशी करावी अशी मागणी नारायण राणेंनी केली.

राज्याचा मुख्यमंत्री कोण ?

राज्याचा मुख्यमंत्री कोण, असा प्रश्न मला पडलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, जयंत पाटील की बाळासाहेब थोरात ? नक्की मुख्यमंत्री कोण ? की बाहेरुन कोणी मुख्यमंत्री आहे, संजय राऊतांसारखा , असा प्रश्न राणेंनी केला.

मुख्यमंत्र्यांना आलेल्या निवेदनावर मुख्यमंत्री काहीही लिहित नसल्याचा आरोप राणेंनी केला.

निवेदनं पडून आहेत , त्यावर कोण लिहिणार, कारवाई कोण करणार, असा सवाल देखील राणेंनी केला.

संजय राऊतांना सत्तेचा माज चढलाय

संजय राऊतांना सत्तेचा माज चढलाय. त्यांची जीभ फार चालतेय. सत्तेमध्ये त्यांच्या भावाला मंत्रीपद मिळालं नाही.

यानंतर संजय राऊतांचे अनेक वक्तव्य आले. यावरुन त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्या सारखं वाटतंय.

महाराजांच्या नावावर सत्तेवर आलात.

महाराजांबद्दल त्यांच्या वंशजाबद्दल कोणीही कोणतही वाक्य, शब्द काढल्यास, भाजप पक्ष आणि मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

संजय राऊतांच्या वक्तव्याच्या नारायण राणेंनी निषेध केला. परत त्यांनी असं बोलण्याचं धाडस करु नये, असं नारायण राणे म्हणाले.

संजय राऊतांनी बुधवारी पुण्यात एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी उद्यन राजेंकडे शिवाजी महाराजांचे वशंज असल्याचे पुरावे मागितले होते.

यासर्व प्रकरणावरुन नारायण राणेंनी संजय राऊतांचा समाचार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.