Wed. Jun 19th, 2019

नारायण राणे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

0Shares

नारायण राणे यांची पुन्हा एकदा काँग्रेस प्रवेशाची शक्यता असल्याची माहीती सुत्रांकडून मिळाली आहे. गोवा मार्गे नारायण राणे दिल्लीला रवाना झाले आहेत असंही सांगण्यात येत आहे. काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी महाराष्ट्रात वेगळी रणनीती आखली जात असल्याची चर्चा होत आहे.‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष‘हा स्वतंत्र पक्ष नारायण राणे यांनी स्थापन केला आहे. आणि आता पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राणेंच्या काँग्रेस प्रवेशाची शक्यता

2005 साली नारायण राणेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला

2008 साली त्यांनी तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनियांविरोधात बंड पुकारलं

2009 साली निलंबित झालेल्या राणेंना माफीनाम्यानंतर परत घेतलं

2017 साली त्यांनी काँग्रेसलाही रामराम केला

2017 सालीच त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली

2018 साली पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला

‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष‘हा स्वतंत्र पक्ष नारायण राणे यांनी स्थापन केला आहे.

आता पुन्हा नारायण राणे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: