Tue. Sep 27th, 2022

नवरात्रीत नारायण राणे भाजपमध्ये घटस्थापना करणार? सिंधुदुर्गत केली घोषणा

जय महाराष्ट्र न्यूज, कुडाळ

 

काँग्रेसनं सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर पहिल्यांदाच नारायण राणे सिंधुदुर्गात दाखल झाले. यावेळी नारायण राणेंनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपली राजकीय ताकत दाखवण्याचा प्रयत्न केला.

 

यावेळी घटस्थापनेला अर्थात 21 सप्टेंबरच्या पत्रकार परिषदेत राणे मोठी घोषणा करणार आहेत. त्यांना कार्यकर्तांना जोमाने कामाला लागण्याच्या सूचना देत पुढील वाटलाचीत कायम सोबत राण्याचे आवाहन केले. त्यामुळे आता नारायण राणे भाजप प्रवेशाबाबत अधिक क्लायमॅक्स निर्माण झाला आहे.

 

नवरात्रीत राणे भाजपमध्ये घटस्थापना करण्याची जोरदार चर्चा सुरु आहे.   

 

नारायण राणेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

 

– अशोक चव्हाणांना नारायण राणे कळलेच नाही

– नारायण राणेला डिवचलं की अधिक ताकद येते

– अशोक चव्हाणांनी काँग्रेस पक्ष संपवायची सुपारी घेतलेय

– पितृ पक्षात कोणताही निर्णय घोषीत करणार नाही

– घटस्थापनेला नारायण राणे आपला निर्णय जाहीर करणार

– आता बघा कोण कोणाला धक्का देतयं

– आदर्श हा अशोक चव्हाणांच्या आवडीचा शब्द

– पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बदल करण्याची अनेकदा सूचा केली

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.