अखेर मुहूर्त ठरला! नारायण राणे ‘या’ दिवशी भाजपात प्रवेश करणार

काही दिवसांवर विधानसभा निवडणूक ठेपली असताना नारायण भाजपात प्रवेश करणार का ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. मात्र या प्रश्नाला आता खूद नारायण राणेंनी पूर्णविराम दिला आहे. नारायण राणे 2 ऑक्टोबर रोजी मुंबईत भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती निश्चित असल्याचे समजते आहे.
राणे भाजपात ?
येत्या 2 ऑक्टोबरला नारायण राणे भाजपात प्रवेश करणार आहेत.
विशेष म्हणजे नारायण राणेंसह नितेश आणि निलेश राणेही भाजपात प्रवेश करणार आहे.
माझ्या भाजपा प्रवेशामुळे शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार असल्याचे नारायण राणे यांनी म्हटलं होतं.
भाजपात समावेश होण्याचे पक्षाने आमंत्रण दिले असल्याचे राणे म्हणाले होते.
मात्र अखेर त्यांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त ठरला असून 2 ऑक्टोबर रोजी भाजपात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.