Sun. Oct 17th, 2021

डॉ नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी आता अंनिस पुढाकार घेणार

जय महाराष्ट्र न्यूज, वर्धा

 

डॉ नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात यंत्रणा कमी पडत असल्याचं दिसून येत आहे.

 

सरकारही आपल्या जबाबदारीत कमी पडत असल्याचा आरोप करीत मारेकऱ्यांना शोधण्यात अंनिस पुढाकार घेणार आहे.

 

त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोलकर यांनी येत्या 20 जुलैपासून राज्यभर ‘जवाब दो’ आंदोलनाचा इशारा दिला आहे.

 

वर्ध्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेl हमीद दाभोलकर बोलत होते. अनिस स्वतः पुढाकार घेऊन या मारेकऱ्यांचा फोटो ठिकठिकाणी लावून आंदोलन करणार आहे.

 

सीबीआयने मारेकऱ्यांना शोधण्यासाठी 5 लाखांचे बक्षीस जाहीर केले. मात्र, अद्याप महाराष्ट्र सरकारनं बक्षीस जाहीर केलं नाही.

 

दरम्यान, दाभोळकर आणि गोविंद पानसरे हत्या प्रकरण आणि गुजरातमध्ये मागासवर्गियांना झालेली मारहाण याच्याविरोधात साताऱ्यात मोर्चा काढण्यात आला.

 

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. तसेच या मोर्चामध्ये विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *