Mon. Dec 6th, 2021

सबका विकास, सबका विश्वास- नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी यांची पुन्हा एकदा संसदीय नेतेपदी NDA ने एकमताने निवड केली. त्यामुळे मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. आपली एकमताने निवड झाल्याबद्दल मोदी यांनी सर्वांचे आभार मानले.

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

भाजप खासदारांनी माझी एकमताने निवड केली. NDA नं माझी निवड केली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. नव्या भारताच्या संकल्पाला, नव्या ऊर्जेने पुढ वाढवायला येथून नव्या यात्रेला सुरुवात करणार आहोत.
निवडणूक आयोग, कर्मचारी, जवान यांचं मी अभिनंदन करतो. भारताच्या या विजय उत्सवात जगभरातील भारतीयांनी भाग घेतला, त्या सर्वांचं अभिनंदन करतो. खूप मोठा जनादेश मिळालाय, त्यामुळे जबाबदारी वाढलीये. मात्र जबाबदारी घ्यायला आम्ही कायम तयार असतो. नव्या ऊर्जेने आम्ही पुढ जाणार आहोत. भारताची लोकशाही, मतदार खूप हुशार आहेत. 2019 च्या निवडणुकीने हृदयाला जोडण्याचं काम केलं आहे. लोकांमधील भिंती नष्ट केल्या आहेत. समता व ममताचं वातावरण निर्माण केलं आहे.
विश्वास जेव्हा मजबूत असतो, तेव्हा इंनकम्बन्सीही काम करु शकत नाही. प्रो इंनकम्बन्सीमुळे लोकांनी सरकार पुन्हा आणायचं आहे, त्यामुळे जनतेने सकारात्मक आदेश दिला आहे. जनता व सरकारमध्ये विश्वासाचं वातावरण आहे. इमानदार असेल तर देशाची जनता त्याला साथ देते. परिश्रम करणाऱ्याची भारतातील जनता पूजा करते. ज्यांनी विश्वास दाखवला त्यांच्यासोबत आहोत.  ज्यांनी विश्वास दाखवला नाही, त्यांचा विश्वास संपादन करू. लोकप्रतिनिधी म्हणून आपण भेदभाव करु शकत नाही.
2014 मधील निवडणुकीपेक्षा आता 25 टक्के जास्त मतं जास्त मिळाली आहेत. डोनाल्ड ट्रम्पला जितकी मते मिळाली तितकी मतांची वृध्दी आम्हाला मिळाली आहे. आम्ही निवडणूक लढली नाही, तर लोकांनी निवडणूक लढवली आहे. निवडणुकीतील दौरा एकप्रकारे तीर्थयात्रा होती. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर प्रथमच अशा प्रकारचे मतदान झालं आहे. भर उन्हामध्ये लोकांनी मतदानासाठी उतरले होते. महिलांची मतदान टक्केवारी पुरूषांपेक्षा कमी असते. मात्र यावेळी महिलांनी मतदानाची टक्केवारी पुरुषांइतकी आहे. NDAचं दुसरं नाव एनर्जी आणि सिनर्जी. या दोन्ही गोष्टींमुळे आम्हाला ऊर्जा मिळत आहे. सर्वांना जोडून घेणं यात देशहित आहे. त्यामुळे एनडीएला अजून खूप पुढे जायचे आहे. आता आपल्यासाठी कुणीही परकं नाही. प्रादेशिक पक्षांचं महत्त्व नाकारून चालणार नाही. बाळासाहेब ठाकरे आता नाहीत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा सल्ला घेतो. मनोहर पर्रिकर यांची ओळख साधेपणामुळे झाली होती.
माझी स्पर्धा कुणाशी असं मला विचारलं गेलं होतं. तेव्हा माझी स्पर्धा स्वतःशीच असल्याचं मी सहज उत्तर दिलं होतं. पण आज मात्र 2019 मध्ये निवडून आलेल्या मोदींना 2014 मधील मोदींची स्पर्धा आहे.

बेताल वक्तव्य करणाऱ्या आपल्या पक्षातील नेत्यांना टोला!

आपल्या वाणी व वर्तनामध्ये बदल करणे गरजेचं आहे. लक्षावधी कार्यकर्त्यांमुळे आपण आज इथे आहोत. काहीजणांच्या बेताल वक्तव्यांचा त्रास होतो. आपल्या शरीरातील कार्यकर्ता जिवंत ठेवला पाहिजे. अहकांर दूर ठेवला पाहिजे, अहंकारामुळे जवळचे लोकं दूर होऊन जातात. आज आम्ही आहोत, ते फक्त जनतेमुळे आहोत.
या देशामध्ये कित्येक नरेंद्र मोदी झाले आहेत, त्यांनी मंत्रीमंडळाची नावंही जाहीर केले आहेत. मीडिया काही नाव मंत्रीपदासाठी चालवत आहेत, मीडिया अफवा पसरवत आहे. चुकीच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. वृत्तपत्रामुळे कोणी मंत्री बनत नाही, तुम्हाला मंत्रीपदासाठी फोन जरी आला तरी कन्फर्म करा. दिल्लीमधील दलालापासून दूर राहा. दिल्लीमध्ये अशा काही व्यवस्था आहे की तुमचं जीवन उद्ध्वस्त करते. मी VVIP कल्चरचा विरोधी आहे. मंत्रीपद योग्यतेनुसार मिळणार. एअरपोर्टवर जर सुरक्षासाठी जर तपासणी केली तर वाईट वाटण्याचे कारण नाही.

ज्यांनी आम्हाला मतदान केलं, तेही आमचेच आणि आमचा विरोध करणारेही आमचेच आहे. आपण जिंकत नाही, जनता आपल्याला निवडून देते. अल्पसंख्यकांमध्ये काल्पनिक भय निर्माण केलं जातंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *