Sun. May 16th, 2021

‘मोदी हटाव’ हाच विरोधकांकडे मुद्दा; मोदींचा विरोधकांवर घणाघात

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला उद्यापासून सुरुवात होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकलूजमध्ये जाहीर सभा घेतली. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अकलूजमध्ये सभा घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विजय सिंह मोहिते पाटील आणि इतर दिग्गज नेतेही उपस्थित होते. तसेच मोदींनी आपल्या भाषणात शरद पवारांवर बोचरी टीकाही केली आहे.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?

अवकाळीच्या नुकसानीबद्दल दु:ख असल्याचे मोदी म्हणाले.

शरद पवारांना वेळेआधी हवेची दिशा समजते असल्याची टीका यावेळी केली.

पराभवाच्या भीतीने पवारांनी मैदनातून पळ काढला असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

मजबूत देशासाठी मजबूत सरकार पाहिजे.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महामिलावट कधीच मजबूत सरकार देऊ शकत नाही.

मोदी हटाव हा विरोधकांकडे एकच मुद्दा आहे.

भारताला महाशक्ती बनवण्यासाठी केंद्रात मजबूत सरकार हवे आहे.

भ्रष्टाचार आणि काळा पैशांवर हल्ला केला.

राहुल गांधी यांनी माझी जात काढली असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नसल्याचे त्यांनी आपले मत व्यक्त केले.

हा संपूर्ण देश माझा कुटुंब आहे.

ऊसापासून इथेनॉल बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

शेतकऱ्यांच्या मुद्यावरून शरद पवारांवर टीका केली.

समुद्राचं पाणी प्रक्रिया करून दुष्काळग्रस्त भागांना देणार असे आश्वासन मोदींनी दिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *