Sat. Jun 12th, 2021

5 वर्षांत व्यापारांसाठी केले 1500 जुने कायदे रद्द – नरेंद्र मोदी

देशाच्या आर्थिक व्यवहाराला त्या देशाचा व्यापारी वर्ग जास्तीत जास्त जबाबदार असतो. व्यापारीवर्गाला जाचक अशा कायद्यांना मोडून काढत व्यापाऱ्यांच्या समृद्धीसाठी नव्या उपाययोजना आम्ही आखल्या, असं व्यापाऱ्यांशी दिल्लीमध्ये संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. व्यापाऱ्यांना अडचणीच्या ठरत असणाऱ्या जवळपास 1500 जुन्या कायद्यांना सरकारने आत्तापर्यंत रद्द केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

व्यापारीवर्गासाठी  1500 कायदे रद्द

व्यापारीकरणाला आळा घालणाऱ्या कायद्यांना रद्द करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते.

2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक दिवसाला एक कायदा रद्द करू, असे आश्वासन दिले होते.

त्यानुसार मोदींनी जवळपास 1500 कायदे रद्द केल्याचे यावेळी सांगितले.

युवा वर्गाला व्यापार क्षेत्रामध्ये अनेक अडचणींना सामोरे जाले लागत होते.

याच कायद्यांमध्ये डिजिटल व्यवस्था, नियम प्रणालीमध्ये होत असलेला बदल आणि जीएसटीमुळे व्यापाराकडे दुर्लक्ष होत आहे.

त्यासाठी मोदी सरकारने विशेष प्रयत्न केले आहेत.

याचसाठी एका तासाच्या आत व्यवसाय सुरु करण्यासाठी एक कोटीपर्यंत कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *