Sun. Jan 17th, 2021

म्हणून पंतप्रधान मोदींनी पेट्रोलपंप रविवारी बंद ठेवण्याचा घेतला निर्णय

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

पंतप्रधान मोदींनी इंधन वाचवण्याच्या आवाहनाला देशातील पेट्रोलियम वितरकांच्या संघटनेने पाठिंबा देत महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. येत्या 14 मे पासून आठ राज्यांतील पेट्रोलपंप दर रविवारी बंद राहतील.

 

तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, हरयाणा या राज्यांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे या राज्यांमधील अंदाजे 20 हजार पेट्रोल पंप प्रत्येक रविवारी बंद राहतील.

 

केवळ रुग्णवाहिका आणि आपातकालीन सेवेच्या वाहनांनाच रविवारी पेट्रोल भरून दिले जाईल. त्यासाठी रविवारी पेट्रोल पंपावर एक कर्मचारी उपलब्ध असेल. ‘पीटीआय’ने दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयाची माहिती अजूनपर्यंत तेल कंपन्यांना देण्यात आलेली नाही. याबद्दलची चर्चा अजूनही सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *