Sat. Oct 24th, 2020

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाच्या विरोधातील याचिकेवर 1 एप्रिलला सुनावणी

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र विरोधकांनी या चित्रपटाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यापूर्वी हा चित्रपट 12 एप्रिल रोजी होणार होता. मात्र चित्रपटाची तारीख बदलून 5 एप्रिल करण्यात आली. मात्र निवडणुकांच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित झाला तर मतदारांवर, प्रचारावर परिणाम होईल. तसेच यावेळी हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये, अशी मागणी करण्यात आली.

नेमकं प्रकरण काय ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनावर चित्रपट बनवण्यात आला आहे.

पीएम मोदी असं या चित्रपटाचे नाव असून अभिनेते विवेक ओबेरॉय यांनी मोदींची भूमिका साकारली आहे.

हा चित्रपट 5 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

विरोधकांनी या चित्रपटाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

या चित्रपटामुळे मतदारांवर तसेच प्रचारावर परिणाम होऊ नये तसेच निवडणुकीच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.

या याचिकेवर 1 एप्रिलला सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाला याची नोटीस मिळाली नसल्यामुळे ही सुनावणी 1 एप्रिलला होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *