Fri. May 7th, 2021

मोदींची केदारनाथ यात्रा ही ‘नौटंकी’, पवार यांचं इफ्तार पार्टीत वक्तव्य!

लोकसभा निवडणुकांसाठीचे मतदान नुकतेचं आटोपले आहे. मात्र राजकिय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरूच आहेत. मोदींनी ही निवडणुका संपल्यानंतर केदारनाथ-बद्रीनाथचे दर्शन घेतलं आहे. केदारनाथच्या गुफेतील ध्यानमुद्रा करत असतानाचे फाटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्या या दर्शन घेण्यावर देखील टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मोदींच्या केदारनाथ दर्शन घेण्याला ‘नौटंकी’ असल्याचं म्हटलं होतं.

शरद पवारांची मोदींवर टीका

निवडणुकासाठीचे मतदान  आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ-बद्रीनाथचं दर्शन घेतले.

त्यांनी केदारनाथ येथील गुहेत साधना केली. त्यांचे ध्यानमुद्रेतील फोटो देखील व्हायरल झाले होते.

त्यांच्या या  ध्यानमुद्रेवरून विरोधक त्यांच्यावरती खोचक टीका करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील त्यांच्यावर खोचक टीका केली आहे.

मोदींचं केदारनाथ दर्शन ही ‘नौटंकी’ असं म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसनं सोमवारी मुंबईतील इस्लाम जिमखाना इथं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.

या पार्टीदरम्यान शरद पवारांनी माध्यमांशी बोलत असताना त्यांनी मोदींवर टीका केली आहे.

यावेळी बोलताना शरद पवार यांनी एक्झिट पोलच्या आकड्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

वृत्तवाहीन्यांनी जाहीर केलेले एक्झिट पोल देखील एक नाटकचं आहे असं ही त्यांनी म्हटलं आहे.

आजकाल माध्यम देखील सत्ताधाऱ्यांच्या बाहुल्या आहेत असं शरद पवारांनी म्हटलं होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *