Mon. Dec 16th, 2019

मोदी आणि ट्रम्प यांची भेट, या महत्वपूर्ण विषयांवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ओसाकामध्ये भेट झाली आहे.  जपानमधील ओसाकामध्ये जी २० परिषद सुरू झाली असून याठिकाणी या दोघांची भेट झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ओसाकामध्ये भेट झाली आहे.  जपानमधील ओसाकामध्ये जी २० परिषद सुरू झाली असून याठिकाणी या दोघांची भेट झाली आहे. यामध्ये महत्वपुर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. ट्रम्प यांनी मोदींना ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे. माझ्या दुसऱ्या टर्मच्या सुरूवातीलाच तुमची भेट झाली याचा आनंद मोदींनी व्यक्त केला आहे. भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांवर देखील चर्चा करण्यात आली आहे.

ट्रम्प आणि मोदींमध्ये महत्वपूर्ण चर्चा

ओसाकामधील 20 परिषदेत नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली.

यामध्ये दोन्ही देशांतील चांगले संबंध आणि सुरक्षा यावर चर्चा झाली आहे.

निवडणुकांच्या निकालानंतर फोन करून शुभेच्छा दिल्याबद्दल मोदींनी ट्रम्प यांचे आभार मानले आहेत.

मी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर सुरुवातीलाच तुमची भेट होते असे म्हणत मोदींनी आनंद व्यक्त केला आहे.

भारताला अमेरिकेसोबत चांगले संबंध ठेवायचे आहेत. असे मत यावेळी मोदींना व्यक्त केले आहे.

भारत हा अमेरिकेचा चांगला मित्र आहे. हे तुमच्यामुळे शक्य झाले आहे.

तुमचे निवडणुकांमधील यश ही तुमची क्षमता असल्यामुळे तुम्हाला मिळाले आहे. असं मत ट्रम्प यांनी व्यक्त केलं आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *