Mon. Sep 27th, 2021

देशाला एअर स्ट्राइकाचे पुरावे हवेत की वीरपुत्र ? – नरेंद्र मोदी

आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांवरच असल्याने सर्व राजकीय पक्ष प्रचार करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेरठमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. या सभेमध्ये मोदींनी अनेक प्रश्नांवर भाष्य केले असून विरोधकांवर घणाघाती टीकाही केली. यावेळी त्यांनी आपण केलेल्या कामाचा हिशेब देणार असल्याचे सांगितले आहे. तसेच चौकीदार कधीच अन्याय करत नाही असे बोलत विरोधकांवर टोला लगावला.

काय म्हणाले पंतप्रधान ?

सर्जिकल स्ट्राइक करण्याचं धाडस या चौकीदारने केला आहे.

याचवेळीस पंतप्रधान मोदींनी विरोधकांना निशाणा साधत अनेक गोष्टींबद्दल सांगितले.

पुलवामा हल्ला केल्यानंतर भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक केला.

या एअर स्ट्राइकचे विरोधक पुरावे मागत आहे.

त्यामुळे नरेंद्र मोदींनी देशाला पुरावे हवेत की वीरपुत्र ? असा प्रश्न मोदींनी विरोधकांना निशाणा साधत विचारला आहे.

अवकाशात सुद्धा भारताने आपली ताकद दाखवली आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

तसेच राहुल गांधी यांना ए-सॅट म्हणजे रंगभूमीवरील सेट वाटला आहे.

त्यांच्या या गोष्टीवर हसायचं की रडायचं हे समजत नाही.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *