Mon. Sep 20th, 2021

मतदानापूर्वी मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून अनेक दिग्गज नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथील रानिप मतदारसंघात मतदान केले. मतदान करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवास्थानी जाऊन त्यांच्या आई हिराबेन यांची भेट घेतली. तसेच आईचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याबरोबर काही वेळासाठी गप्पाही मारले.

मतदानापूर्वी आईचा आशीर्वाद –

तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली असून देशभरात 116 मतदान होत आहे.

गुजरातमध्ये 26 जागांवर मतदान सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदनगरमध्ये मतदान केले.

यावेळी त्यांच्याबरोबर भाजप अध्यक्ष अमित शाह उपस्थित होते.

2014 मध्ये भाजपाने 26 जागांवर विजय मिळवला होता.

त्यामुळे यावेळी सुद्धा भाजपाला विजय मिळवता येईल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

भाजप अध्यक्ष अमित शाह यांनीही मतदान केले आहे.

अमित शाह यांना गांधीनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *