Wed. Nov 13th, 2019

कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचे मोदींकडून स्वागत

आंतरष्ट्रीय कोर्टाच्या या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत या निर्णयाचे स्वागत केले आहे. सत्य आणि न्याय अखेर जिंकलाय असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

भारताचे सुपुत्र कुलभूषण जाधव यांचा फैसला आज हेग येथे आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावण्यात आला. या प्रकरणी आंतरष्ट्रीय कोर्टाने भारताची बाजू घेतली आहे. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचे ताशेरे आंतरराष्ट्रीय कोर्टाने ओढले. त्यामुळे भारताला काऊन्सिलर ऍक्सेस मिळणार आहे. आंतरष्ट्रीय कोर्टाच्या या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत या निर्णयाचे स्वागत केले आहे. सत्य आणि न्याय अखेर जिंकलाय असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काय म्हणाले मोदी?

कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.

या प्रकरणात सत्य आणि न्यायाचा आज विजय झाला आहे. तथ्यांवरील विस्तृत अभ्यासावर आधारित निर्णयासाठी आयसीजेचे अभिनंदन आहे.

मला खात्री आहे की, जाधव यांना नक्कीच न्याय मिळेल.आमचे सरकार सदैव प्रत्येक भारतीयाच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी कार्यरत राहील.

आंतरष्ट्रीय कोर्टाच्या या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत या निर्णयाचे स्वागत केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *