30 मे रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधान पदासाठी घेणार शपथ

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जनतेने पुन्हा भाजपा सरकारला पसंत केले आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एनडीएला 353 मतं मिळाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार हे स्पष्ट झाले आहे. नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधान पदासाठी शपथ घेणार आहे. शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनमध्ये 7 वाजता पार पडणार आहे.
30 मे रोजी शपथविधी सोहळा –
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपाने सत्ता स्थापन करण्याचा दावा केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधान पदासाठी शपथ घेणार आहे.
राष्ट्रपती भवनमध्ये सायंकाळी 7 वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
शपथविधीची जोरदार तयारी सुरू असून सोहळ्यासाठी 3 हजार पाहुण्यांना निमंत्रण देण्यात येणार आहे.
रविवारी राष्ट्रपतींना भेटून सत्ता स्थापन करण्याचा दावा पंतप्रघानांनी केला.
त्याचबरोबर काही दिवसात मंत्रीमंडळाची स्थापना केली जाणार आहे.
सोहळ्यासाठी कोणा-कोणाला निमंत्रण ?
नरेंद्र मोदी पंतप्रधान पदासाठी शपथविधी घेणार आहेत.
या सोहळ्यासाठी अनेक दिग्गज लोकांना निमंत्रण देणार आहेत.
यामध्ये काही आंतरराष्ट्रीय लोकांचाही समावेश असण्याची शक्यता आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग
रशिया, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात
तसेत सार्कमधील देशांच्या नेतेही या सोहळ्यासाठी उपस्थित असणार असल्याचे समजते आहे.