Mon. Jul 22nd, 2019

मोदींचं ‘राजीव गांधी’ कार्ड!

0Shares
देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्याकडे जात असताना आता प्रचारातील मुद्दे भरकटत असल्याचं जाणवत आहेत. निवडणुकीचा प्रचार विकासावर होण्याऐवजी वैयक्तिक आणि आता पारिवारिक आरोपप्रत्यारोपांभोवती फिरत असल्याचं दिसत आहे.
आत्तापर्यंत झालेल्या 4 टप्प्यांच्या प्रचारात भाजपकडून राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसला लक्ष्य करण्यात आलं. मात्र पाचव्या टप्प्याचा प्रचार माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर केंद्रित होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. सामान्यपणे आपल्या संस्कृतीमध्ये मयत व्यक्तींना दूषणं देण्याची पद्धत नाही. त्यामुळे मोदींच्या या भूमिकेमुळे देशातील सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं आहे.
खरंतर लोकसभेची निवडणूक विकासाच्या मुद्दयावर लढणं अपेक्षित असताना राजकीय पक्ष जाती धर्म भाषा प्रांत यासारख्या मुद्द्यांना घेऊन राजकारण करत आहेत. रोज होणारी चिखलफेक पाहता मतदार याराजकारण्यापासून दूर जात असल्याचा मतदानाच्या टक्केवारी स्पष्ट होतेय.
तरीसुद्धा प्रचारात राजीव गांधी यांच्या उल्लेख झाल्याने निवडणुकीच्या प्रचाराला कलाटणी मिळाली आहे.

ही टीका कशासाठी?

असं असताना सुद्धा नरेंद्र मोदींना राजीव गांधींवर टीका का करावी लागली.
राजीव गांधी यांचं नाव प्रचारात येणं म्हणजे नरेंद्र मोदी यांची ही राजकीय खेळी असल्याचं जाणकार सांगत आहेत.
उत्तर भारतातील दिल्ली आणि पंजाब मधील 13 लोकसभा जागेसाठी पार पडणाऱ्या मतदानात शीख मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय.
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर 1984 मध्ये शिख विरोधी दंगे झाले होते.
याची सगळ्यात जास्त झळ बसली होती दिल्ली आणि पंजाबला.
उसळलेल्या हिंसाचारात या भागातील शीख समुदायाला आपले लोक नाहक गमवावे लागले होते.
या वेळी जेव्हा राजीव गांधी  यांनी घेतलेली भूमिकादेखील शीखांच्या दुःखावर फुंकर घालणारी तरी निश्चितच नव्हती.
त्यामुळे या हत्याकांडाच्या घटना येथील लोकांच्या स्मृतीतून अजून पुरत्या गेल्या नाहीत.
त्यातून जर या आठवणींना पुन्हा उजाळा दिला, तर त्याचा फटका काँग्रेसला बसणं स्वाभाविक आहे.
पंतप्रधानांनी हाच मुद्दा विचारात घेऊन  राजीव गांधी यांचं नाव पुढे केल्याचं सांगितलं जातंय.
मात्र 4 टप्यात झालेल्या प्रचारावेळी देखील काँग्रेस ने नरेंद्र मोदी यांच्या आईचा आणि जशोदा बेन चा उल्लेख करून मोदींच्या परिवाराला लक्ष केले होतं.
त्यामुळे भाजप ने खेळी करत राजीव गांधी यांचा उल्लेख करून प्रचाराला नव्याने तडका देण्याचा प्रयत्न केला आहे.
0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: