Mon. Dec 6th, 2021

तुमचे कर्म तुमची वाट पाहत आहे; राहुल गांधींचे मोदींना प्रत्युत्तर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेत असून कॉंग्रेसवर टीका करत आहेत. पंतप्रधान मोदी एका सभेत बोलताना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर घणाघाती टीका केली होती. राजीव गांधी यांचे आयुष्य भ्रष्टाचारी म्हणून संपल्याची टीका केली होती. मोदींनी केलेल्या या वक्तव्यावर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. लढाई संपली आहे. तुमचे कर्म तुमची वाट बघत आहे, असे राहुल गांधी यांनी ट्विट करून उत्तर दिले आहे.

राहुल गांधी आणि प्रियांका गांधीचे प्रत्युत्तर –

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभे बोलताना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर घणाघाती टीका केली.

तुमच्या वडिलांना इतर देशांनी जरी क्लीन चिट दिली असली तरी त्यांचे आयुष्य भ्रष्टाचार म्हणूनच संपलं, असे पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

मोदींच्या या वक्तव्यामुळे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

लढाई सपंली आहे. तुमचे कर्म तुमची वाट बघत आहेत. माझ्या वडिलांवर टीका करूनही तुम्ही वाचू शकणार नाही, असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे.

तर देशासाठी शहीद झालेल्या व्यक्तींच्या नावावर मतं मागत असून त्यांचा अपमान करत आहे.

राजीव गांधी यांनी ज्यांच्यासाठी आपले प्राण गमावले तीच अमेठीची जनता या सगळ्याचे उत्तर देणार असल्याचे प्रियांका गांधी यांनी ट्विट केेलं.

देश धोका देणाऱ्या व्यक्तीला कधीच माफ करत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *