Tue. Sep 28th, 2021

मेरा बूथ सबसे मजबूत; मोदींचा बूथ कार्यकर्त्यांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय वाराणसी दौऱ्यावर असून आज वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी मोदींनी बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मेरा बूथ सबसे मजबूत असा नारा मोदींनी यावेळी दिला. सर्व बूथ कार्यकर्ते जिंकून आले पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

रामाकडे वानरसेना होती त्याप्रमाणे माझ्याकडे माझ्याकडे सेना असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

यावेळी मतदानाचा टक्का वाढवण्याचा रेकॉर्ड तोडा असेही त्यांनी बूथ कार्यकर्त्यांना म्हटलं आहे.

पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान 5 टक्क्यांनी वाढायला हवे असे मत मोदी यावेळी व्यक्त केले आहे.

देशात सत्ताविरोधात नाही तर सत्ताधाऱ्यांचं बाजूनं वातावरण असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

मी सुद्धा बूथ कार्यकर्ता म्हणून काम केले असून मी देखील भिंतींवर पोस्टर्स लावले.

सर्वांच्या तोंडी एकच वाक्य आहे, पुन्हा एकदा मोदी सरकार.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *