Sun. Aug 25th, 2019

‘नारी शक्ति’ला Oxfordमध्ये स्थान, Word Of The Yearचा बहुमान

9Shares

भारतातील ‘नारी शक्ती’ या शब्दाला आता जागतिक स्तरावर स्थान मिळाले आहे.

महिलांच्या सशक्तिकरणासाठी ऑक्सफर्ड डिक्शनरीने 2018मधील ‘वर्ड ऑफ द ईयर’ म्हणून ‘नारी शक्ती’ या शब्दाची निवड केली आहे.

महिला सशक्तीकरणासाठी सरकारने केलेले प्रयत्न आणि #MeToo आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या शब्दाचा डिक्शनरीत समावेश करण्यात आल्याचे ऑक्सफर्डकडून सांगण्यात आले आहे.

जयपूर येथे शनिवारी आयोजित साहित्य महोत्सवात याबाबत घोषणा करण्यात आली आहे. तज्ञांनी नारी शक्ती या शब्दाच्या निवडीवर चर्चा केली.

बऱ्याच मंथनानंतर ‘नारी शक्ती’ या शब्दाचा ऑक्सफर्ड डिक्शनरीत समावेश करण्यात आला आहे. या आधी 2017 मध्ये ऑक्सफर्डने ‘आधार’ या शब्दाचा समावेश डिक्शनरीत केला होता.

महिलांचे अधिकार आणि प्रत्येक क्षेत्रातील त्यांच्या प्रतिनिधीत्वासंदर्भात ‘नारी शक्ती’ या हिंदी शब्दाचा उपयोग केला जातो.

स्वत:च्या मनाप्रमाणे जगणाऱ्या महिलांसाठी ‘नारी शक्ती’ हा शब्द वापरला जातो, असे मत ऑक्सफर्ड डिक्शनरीचे आहे.

 

 

9Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *