Fri. Sep 30th, 2022

कोळी बांधवांमध्ये नारळी पौर्णिमेचा उत्साह

कोळी समाजात नारळी पौर्णिमेचे विशेष महत्त्व असून सारसोळे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला. गुरुवारी नारळी पौर्णिमेनिमित्त चुनाभट्टी येथील आगरी कोळी बांधवांनी परंपरा जपत नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला. श्रावण महिन्यातील हा सण कोळी आणि आगरी बांधवांसाठी खूपच महत्वाचा असतो. यादिवशी कोळीबांधव समुद्राची पूजा करुन दर्यासागरात नारळ अर्पण करतात. या दिवसापासून ते मच्छिमारीला सुरुवात करतात. नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधव घरी नारळापासून वेगवेगळे पदार्थ तयार करतात आणि हा सण साजरा करतात.

नवी मुंबईत नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवी मुंबईतील सारसोळे गावात नारळी पोर्णिमेनिमित्त दरवर्षी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. समस्त कोळी बांधव वाजत गाजत पालखी काढतात. पावसाळा सुरू होताच खोल समुद्रातील मासेमारी बंद होते. नारळी पौर्णिमेनंतर सागराला नारळ वाहून पुन्हा एकदा मासेमारीला सुरुवात करतात. कोळी समाजात नारळी पौर्णिमेचे विशेष महत्त्व असून सारसोळे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला. नारळी पौर्णिमेनिमित्त बाबासाहेब गावडे मंडई, वरळी बीडीडी चाळीत उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त युवासेनेतर्फे नारळ फोडण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या उत्सवात सहभागी झाल्या. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी स्थानिक राखी विक्रेत्यांकडून राख्या विकत घेऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना राख्या बांधल्या.

दरम्यान, नारळाच्या करवंटीमध्ये साकारला नारळी पौर्णिमेचा सण कलेच्या माध्यमातून दिल्या सणाच्या शुभेच्छा नारळी पौर्णिमा निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मधील नेरूर गावातील हर्षद मेस्त्री यांनी नारळाच्या करवंटी मध्ये समुद्राला नारळ अर्पण करतानाचे चित्र रेखाटले आहे.रंगांच्या साहाय्याने दोन तासात नारळाच्या करवंटी मध्ये हे चित्र साकारत नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पावसाळा सुरू होताच खोल समुद्रातील मासेमारी बंद होते. नारळी पौर्णिमेला कोळी बांधव आणि समुद्रकिनारी राहणारे लोक समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे. नारळी पौर्णिमेनंतर सागराला नारळ वाहून पुन्हा एकदा मासेमारीला सुरुवात करतात.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.