Jaimaharashtra news

NASAने केलं ISROचे कौतुक

भारताचे महत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान-2 च्या विक्रम लॅंडरशी संपर्क तुटल्यानंतर भारतीयांना प्रचंड दु:ख झाले. इस्रोचे प्रमुख के सिवन यांच्या अथक प्रयत्नानंतरही थोड्याकरीता अपयशी ठरल्यामुळे त्यांना अश्रू अनावर झाले. मात्र संपर्क तुटला असला तरी भारतीयांसह इतर देशातून इस्रोचे अभिनंदन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे इस्रोचे कौतुक जगातील सर्वोच्च अंतराळ संशोधन संस्था ‘NASA’ ने केले आहे. NASAने ट्विट करत ISROचे कौतुक केले आहे.

काय आहे नेमकं ट्विट ?

22 जुलै रोजी चांद्रयान -2ने चंद्राकडे झेप घेतली आणि 7 सप्टेंबर रोजी चंद्रावर उतरणार होते.

मात्र काही तांत्रिक अडथळ्यांमुळे विक्रम लॅंडरशी संपर्क तुटला.

अवघ्या 2.1 किमी लांब असताना संपर्क तुटल्यामुळे वैज्ञनिकांना मोठा धक्का बसला आहे.

विक्रम लॅंडरशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

ISROच्या चिकाटी आणि अथक प्रयत्नाचे देशासह इतर देशांनीही कौतुक केले आहे.

NASAने ट्विट करत ISROचे कौतुक केले आहे.

चांद्रयान-2 चा प्रवास आमच्यासाठी प्रेरणादायी असल्याने भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे.

आपण भविष्यात सौर मंडळात शोध घेण्यासाठी संयुक्तपणे काम करु अशी अपेक्षा आहे, असे ट्विट करत म्हटलं आह.

Exit mobile version