चंद्रांच्या पृष्ठभागावर पाण्याचे साठे
चंद्राच्या पृष्ठभागावर पुरेसे पाणी…

वॉशिंग्टन | नासाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक ट्विट करण्यात आलं आहे. ज्यात चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचा साठा आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने चंद्राच्या पृष्ठभागावर पुरेसे पाणी असल्याचा दावा केला आहे. नासाच्या मते सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणाऱ्या चंद्रांच्या पृष्ठभागावर पाण्याचे साठे आढळून आले आहेत. चंद्राच्या उर्वरित पृष्ठभागावरही विखुरलेल्या स्वरुपात पाण्याचे साठे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे संशोधन भविष्यातील मानवनिर्मित मोहिमांनाला बळ देणार आहे तर चंद्रावरील पाणी पिण्यासाठी आणि रॉकेट इंधनासाठी वापरल्या जाऊ शकते. नासाच्या स्ट्रॅटोस्फियर ऑब्जरवेटरी फॉर इन्फ्रारेड एस्ट्रोनॉमी सोफियाचा संशोधकांनी डेटा वापरू हे संशोधन केले आहे. या संशोधनात चंद्र पृष्ठभाग पूर्वीपेक्षा अधिक बारकाव्याने निरीक्षण केले आहे