Tue. Sep 28th, 2021

मंगळावर नासाला सापडला मीठ असण्याची शक्यता असणारा पुरवा

अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाच्या क्युरोसिटी रोव्हर उपग्रहाच्या माध्यमातून माहिती समोर आली आहे की, मंगळ या ग्रहावर सेंद्रिय घटक (संयुगे) सापडली ज्यात भौगोलिक प्रक्रियेचा मागोवा घेता येणार आहे. आता नासाच्या टीमला असे आढळले आहे की या लाल ग्रहावर सेंद्रिय मीठ हे ऑर्गॅनिक कंपाऊंड भाग आहे. ह्या पुराव्याच्या माध्यमातून या ग्रहावरील जीवनाची चिन्हे स्पष्ट होतील. नासाचे वैज्ञानिक जेम्स लुईस यांनी प्रयोगशाळेत संशोधन केल्यानंतर सांगितलं की, क्युरोसिटी रोव्हरवरील पोर्टेबल लॅब डेटाच्या आधारे मंगल ग्रहावर सेंद्रिय मीठ असू शकतं. नासाच्या मते, या ग्रहावर सेंद्रिय घटक आणि से सेंद्रिय मीठ प्रक्रियेची उपस्थिती असल्यास आपण याला जीवाणूंच्या संशोधनापर्यत पोहचवू शकतो. जर मंगळावर मीठ उपलब्ध असेल तर हे नासासाठी मोठे यश असेल. यामुळे संशोधनात आणखी गती निर्माण होईल. शिवाय अनेक गोष्टीचा खुलासा देखील होईल. मंगळ ग्रहावर कधीही जीवन फुलू शकते. अशी आशा संशोधनकांना आहे. पृथ्वीवर देखील जीवनावश्यक ऑगैनिक मीठ, ऑग्जलेट आहे. त्यामुळे मंगळावर कधी जीवन अस्तित्वात होतं का? यावर प्रश्न निर्माण होत आहे. मंगळावर सेंद्रिय रेणू शोधणे ही नासासाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे, कारण त्यानंतरच येथे जैविक प्रक्रियेचे पुरावे गोळा केले जाऊ शकतात. तसेच, मंगळाच्या पृष्ठभागावरील किरणोत्सर्गामुळे सेंद्रिय पदार्थाचा नाश होण्याचे आव्हान देखील नासाला असणार आहे. त्यानंतर या भागाची ड्रिलिंग सुद्धा करणं आवश्यक असणार आहे. शास्त्रज्ञांनी हे शोधून काढले की ही सामग्री किती काळ ग्रहावर आपली छाप ठेवू शकते. नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरमधील वैज्ञानिक जेम्स लुईस म्हणाले, “जर आम्हाला मंगळावर कोठेही सेंद्रिय मीठ सापडले तर त्या भागात अधिक तपासणी करणं हे आवश्यकता असणार आहे.” यासाठी सेंद्रिय सामग्री सुरक्षित आढळू शकते मात्र त्यासाठी भूपृष्ठभागाखाली ड्रिलिंग करणं आवश्यकता आहे. काही शास्त्रज्ञनी संशोधन केले की ही सामग्री किती काळ पृथ्वीवर आपली छाप टिकवून ठेवू शकते. काय आहे आव्हान? मंगळ ग्रहावरील मीठच्या संशोधना करणाऱ्या क्युरिओसिटी रोव्हरमध्ये लागलेल्या उपकरण एसएमएस अडचणी निर्माण होऊ शकतात कारण हे उपकरण मंगळ या ग्रहावरील माती आणि खडकला उष्ण करते. ज्यामुळे गैसे उत्सर्जित होईल. ऑगैनिक मीठ हे उष्ण झाल्यावर जी गॅस निघेल ते काही वेगळ्या स्वरूपात देखील असू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *