Fri. Aug 12th, 2022

नासाचे ‘इनसाइट’ यान यशस्वीपणे मंगळावर लॅन्ड

मंगळ ग्रहावरील रहस्य जाणू घेण्यासाठी ‘नासा’ने (NASA) सोडलेलं ‘मार्स इनसाइट लेंडर’ हे यान 6 महिन्यांहून अधिक काळ आणि 300 दशलक्ष मैलांचा प्रवास करून अखेर मंगळावर यशस्वीपणे उतरलं आहे. सोमवारी मध्यरात्री 1 वाजून 24 मिनिटांनी ते मंगळावर पोहोचलं. मंगळ ग्रहाची अंतर्गत संरचना पृथ्वीपेक्षा किती वेगळी आहे, याचा शोध हे यान घेणार आहे. नासाकडून या ऐतिहासिक घटनेचं थेट प्रेक्षपणही करण्यात आलं.

मंगळाच्या कक्षेत पोहोचताना इनसाइटचा वेग 19800 किलोमीटर प्रतितास इतका होता. मात्र, उतरताना त्याचा वेग कमी होऊन तो 8 किलोमीटर प्रतितास इतका झाला. हे यान मंगळावर उतरतानाची प्रक्रिया 7 मिनिटांपर्यंत सुरू होती. भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी मध्यरात्री 1.24 वाजता ते मंगळावर उतरले. वैज्ञानिकांनी त्यावेळी जल्लोष केला. नासाचे प्रमुख जिम ब्राइडेंस्टाइन यांनी इनसाइट यान यशस्वीपणे उतरल्याची घोषणा करत सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदनही केले. यावर्षी 5 मे रोजी नासाने कॅलिफोर्नियाच्या वंडनबर्ग एअरफोर्स स्टेशनवरून एटलस व्ही रॉकेटद्वारे या यानाचे प्रक्षेपण केले होते. यापूर्वी 2012 मध्ये मंगळावर क्युरोसिटी हे यान पाठवण्यात आले होते. तेव्हा मंगळावर पाणी असल्याची माहिती मिळाली होती.

NASA

@NASA

📸 Wish you were here! @NASAInSight sent home its first photo after :

InSight’s view is a flat, smooth expanse called Elysium Planitia, but its workspace is below the surface, where it will study Mars’ deep interior.

21.4K people are talking about this

NASAInSight

@NASAInSight

My first picture on ! My lens cover isn’t off yet, but I just had to show you a first look at my new home. More status updates:http://go.nasa.gov/InSightStatus 

23.2K people are talking about this

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.