Thu. Jun 17th, 2021

मंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा दबदबा नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद

वॉशिंग्टन : नासानेचं ‘मंगल मिशन’ हे सर्वांत मोठं मिशनपैकी एक आहे. अमेरिकेची स्पेस एजन्सी नासाची ही मंगळावरील आतापर्यंतची सर्वात यशस्वी उड्डाण असून या हेलिकॉप्टर Ingenuity ने आपली पाचवी फ्लाईटच नाही तर एक वन वे ट्रिपदेखील पूर्ण केली आहे. तसेच Perseverance Rover पासून वेगळे होऊन Jezero Crater च्या Wright Brothers Fields मध्ये फ्लाईट टेस्ट करणाऱ्या हेलिकॉप्टरने दक्षिणेकडे 129 मीटर दूर उड्डाण केले आहे. या उड्डाणावेळच्या रोटर ब्लेडचा आवाज देखील ऐकायला मिळात आहे. नासानी याबद्दलची माहिती जाहीर केली असून काही फुटेज नासाच्या सहा चाकी रोव्हरने टिपले आहे. या फुटेजमध्ये रोव्हरने हा आवाज हा ३० एप्रिलला रेकॉर्ड केला होता. हे सर्वांत मोठी यश नासाने संपादित केल आहे. तीन मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये की आणि दबक्या आवाजात हेलिकॉप्टरची ब्ले़ड जशी आवाज करतात तसा आवाज येत आहे. जेझेरो क्रेटरवर बेल्ड फिरल्याने वाऱ्याचा आवाज होत आहे. ही ब्लेड 2,400 rpm या वेगाने फिरत आहेत. तर या आवाजाची उंची 872 फूटांवर आहे. पाचव्या उड्डणावेळी एअरफिल्डवर जाऊन हेलिकॉप्टरने 10 मीटरची उंची घेतली आहे. शिवाय लँड होण्याआधी या हेलिकॉप्टरने हाय रिझोल्यूशन फोटोदेखील घेतले होते. Ingenuityच्या मदतीने रोटरक्राफ्ट टेक्नॉलॉजीची चाचणी आता परग्रहावरही केली गेली आहे. आता ही चाचणी एका नवीन फेजमध्ये गेली आहे. हे हेलिप्टर लाल ग्रहाची पाहणी करणार आहे. भविष्यात अंतराळवीरांचे याठिकाणी जाणे कठीण आहे मात्र हे हेलिकॉप्टर मंगळ ग्रहाचे संशोधन करत आहे. या हेलीकॉप्टरची पाचवी उड्डाणही 108 सेकंदांची होती . गेल्या उड्डाणापेक्षा यावेळची जागा सपाट आणि कोणतीही अडथळा नसणारी होती. Ingenuityला रोव्हरवर सुपरकॅम नावाचे डिव्हाईस लावलेले आहे. यामध्ये असे सेन्सर आहेत, जे रोव्हरसमोरील आलेल्या दगडांचा अभ्यास करतात. तसेच पाण्याचा अंश आहे की नाही आणि त्यामध्ये कोणकोणती रसायन आहेत ही देखील माहिती याद्वारे मिळणार आहे. या सुपरकॅममध्ये उच्च क्षमतेचा मायक्रोफोन आहे.ज्याद्वारे दगड आणि पृष्ठभाग किती कठीण आहे हे रेकॉर्ड होणार आहे. नासाच्या संशोधकांनी म्हटलं की, ‘मायक्रोफोनने जे रेकॉर्ड केले आहे ते आमच्यासाठी एक प्रकरचा सुवर्ण क्षण आणि भविष्यात असचं काम करू असं त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *