Thu. Jun 20th, 2019

मंगळावरील ढगांचे फोटो तुम्ही पाहिलेत का?

0Shares

NASA च्या मंगळ मोहिमेचा भाग असलेल्या ‘क्युरियॉसिटी’ रोव्हर ने मंगळावरील ढगांचे फोटो पाठवली आहेत.या ढगांचे पृथ्वीवरील ढगांशी साम्य असल्याची माहिती  NASAने दिली आहे. या ढगांमध्ये बर्फाच्या रुपात पाणी असल्याचे समजते आहे.

कसे मिळाले हे फोटो ?

सध्या ही रोव्हर मंगळावरील ‘माउंट शार्प’ या डोंगराळ भागातील ‘गेल क्रेटर’ च्या (दरी) तळाच्या भागाचा अभ्यास करत आहे.

क्युरियॉसिटीच्या माध्यमातून या ठिकाणी पृष्ठभागावर उत्खनन केले जाते.

यावेळी रोव्हरवर बसविण्यात आलेल्या कॅमेराद्वारे मंगळावरील ढगांची फोटो काढले आहेत.

ही छायाचित्रे ७ मे १७ मे या कालावधीत टिपण्यात आली आहेत.

या फोटोमध्ये दिसणाऱ्या ढगांमध्ये बर्फाच्या रुपात पाणी असल्याचे NASAने सांगितले आहे.

मंगळाच्या पृष्ठभागा पासून सुमारे ३१ किलोमीटर उंचीवर असलेल्या या ढगांचे पृथ्वीवरील ढगांशी साम्य आहे.

हे ढग दुसऱ्या ग्रहावरुन ही दिसू शकताता असे NASAने सांगितले आहे.

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: