Thu. May 6th, 2021

नासाचं हेलिकॉप्टर Ingenuity ने पहिल्यांदा भरली यशस्वी उड्डाण

वॉशिंग्टन: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं आणखी एक नवा इतिहास रचला आहे. मंगळावर पाठवण्यात आलेलं नासाचं हेलिकॉप्टर Ingenuity ने आज पहिल्यांदा यशस्वी उड्डाण केली असून एक इतिहासात रचला आहे. या हेलिकॉप्टरच्या उड्डाणाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले होते.

नासाकडून या ऐतिहासिक घटनेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले आहे. शिवाय नासानं सांगितलं की, रात्री जवळपास 3.30 वाजता इनजेनयुटी हेलिकॉप्टरने मंगळ ग्रहावरील जेजेरो क्रेटरमध्ये तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या हेलिपॅडवरून उड्डाण घेतले. पृथ्वी शिवाय इतर ग्रहावर पहिल्यांदा हेलिकॉप्टर उडाले असल्यानं हे ऐतिहासिक मानलं जात आहे. जवळपास 10 फुट उंच उडाल्यानंतर पुन्हा हे हेलिकॉप्टर लॅन्ड करण्यात आलं. हे जवळपास 30 सेकंदांपर्यंत सुरु होतं.

त्यानंतर नासाच्या Ingenuity या रोटरक्राफ्टने आपल्या चार कार्बन-फायबर पातींच्या आधारे उड्डाण घेतली. या पाती प्रति मिनिटाला 2500 वेळा फिरतात, अशी माहिती आहे. हा वेग पृथ्वीवर असलेल्या हेलिकॉप्टरच्या पातींच्या रोटेटिंग वेगापेक्षा जवळपास पाचपट अधिक असून मंगळावरील वातावरण पृथ्वीच्या तुलनेत 100 पट अधिक हलकं असल्यामुळे पातींच्या क्षमता अधिक आहे. हेलिकॉप्टर उड्डाण करण्यासाठी आधी 11 एप्रिल ही तारिख निश्चित केली होती, मात्र काही कारणास्तव ते उड्डाण होऊ शकलं नव्हतं. इनजेनयुटी नावाचं हे अमेरिकी हेलिकॉप्टर मंगळावरील अशा स्थानांवर जाऊ शकणार आहे जिथं रोवर पोहोचू शकत नाहीत. नासाने हा नवा विक्रम प्रस्थापित केल्यानं अनेक देशांमधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *