Fri. Jun 21st, 2019

विराट जगातला सर्वांत असंस्कृत खेळाडू- नसिरुद्दिन शाह

0Shares

आपल्या उत्तुंग अभिनयाबरोबरच आपल्या बेफाम वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध असणारे अभिनेते नसिरुद्दिन शाह यांनी यावेळी टीम इंडियाचा क्रिकेट कॅप्टन विराट कोहली याच्यावर हल्लाबोल केलाय. विराट कोहली हा जगातला सर्वांत वाईट वर्तणूक असलेला खेळाडू असल्याची टीका नसिरुद्दिन शाह यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून केलीय.

विराट कोहली हा जगातला सर्वोत्तम फलंदाज आहे, पण तो जगातला सर्वांत असंस्कृत खेळाडूही आहे. त्याचं क्रिकेटमधील प्राविण्य त्याच्या उद्दामपणामुळे आणि वाईट वर्तणुकीमुळे झाकोळून जातं. असं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय. यापुढे आपल्या पोस्टमध्ये शाह यांनी आणि माझा देश सोडून जायचा कोणताही विचार नाही अशी खोचक टिप्पणीही केली आहे.

 

भारतीय खेळाडू न आवडणाऱ्या क्रिकेट रसिकांनी भारत सोडून निघून जावं, असा सल्ला विराट कोहली याने दिला होता. त्याच वक्तव्याचा आधार घेऊन नसिरुद्दिन शाह यांनी ही पुस्ती जोडली आहे.

सोमवारी कोहली आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू पेन हे आपसांत भिडत होते. याच पार्श्वभूमीवर आणि आधीच्या अनेक वादग्रस्त वर्तणुकीचा संदर्भ घेत नसिरुद्दिन शाह यांनी हे विधान केलं आहे.

शाह यांच्या विधानावर अनेक उलट सुलट प्रतिक्रिया येत आहे. काहीजणांनी त्यांना दुजोरा दिलाय, तर काहीजणांच्या मते ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंशी असंच वागायला हवं होतं. या पोस्टमुळे विराटच्या आक्रमक वागण्यात फरक पडण्याची शक्यता सुतराम शक्यता नाही, उलट नसिरुद्दिन शाह यांना मात्र कोहलीच्या चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: