Mon. Jul 26th, 2021

पीएम केअर निधीतून मिळालेले ६० व्हेंटिलेटर धूळ खात पडून

नाशिक: पी.एम.केअर निधीतून नाशिकला प्राप्त झालेले ६० व्हेंटिलेटर धूळ खात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. व्हेंटिलेटर इन्स्टॉल करणाऱ्या कंपनीने व्हेंटिलेटर इन्स्टॉल करण्यास नकार दिल्याने हे सगळे व्हेंटिलेटर आजही त्याच अवस्थेत धूळ खात पडून आहेत.

केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळालेले हे व्हेंटिलेटर नाशिकमध्ये बिकट परिस्थिती असतानासुद्धा पडून आहेत. प्रशासन आणि व्हेंटिलेटर इन्स्टॉल करून देणाऱ्या कंपनीत असलेल्या असमन्वायामुळे हा प्रकार घडला आहे.

सदर कंपनीसोबत चर्चा सुरू असून हे व्हेंटिलेटर लवकरच इंस्टॉल होतील अशी माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे. मात्र एकूणच व्हेंटिलेटर खाटांअभावी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुगांना आपले प्राण गमवावे लागले असताना केंद्र सरकारने व्हेंटिलेटर दिल्यानंतरही ते रुग्णांच्या कमी येत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *