Fri. Jan 21st, 2022

ऐन सणासुदीत चैन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

शुक्रवारी गणरायाचं उत्साहात आणि आनंदात आगमन होत असतांनाच नाशिकमध्ये अवघ्या काही तासांत तीन चैन स्नॅचिंगच्या घटना

घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असताना देखील चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळाला.

नाशिकच्या पंचवटी, तारवाला नगर आणि मुंबई नाका परिसरात या सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. 

 

पंचवटी परिसरात काळाराम मंदिराजवळ राहणाऱ्या अनिता मिश्रा गोदावरी नदी परिसरातून आपल्या घरी येत असतांना बाईकवरुन आलेल्या

दोन चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील 5 तोळ्यांची चैन लांबवली. दुसऱ्या घटनेत जयश्री पाटील यांची, तर तिसऱ्या घटनेत पुष्पां गांगुर्डे यांची

चैन चोरट्यानी पळवली.  तिनही प्रकरणात बाईक चोरट्यांचा समावेश आहे. या प्रकरणी नाशिक पोलीस तपासांचा तपास सुरु आहे.

 

या घटनांमुळे महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे पाहायला मिळत आहे. मागच्या 15 दिवसांपूर्वीच चार ते पाच चैन

स्नॅचिंगच्या घटना घडल्या होत्या. आरोपींना पकडण्यात अद्याप पोलीसांना यश आले नाही. चैन स्नॅचिंगचे सत्र सुरुच असल्याने चोरट्यांना

पकडण्याचे एक मोठे आव्हान पोलिसांसमोर येऊन टेकले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *