Jaimaharashtra news

अंडरवर्ल्ड डॉन बनण्यासाठी पुस्तकांचा वापर

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

अंडरवर्ल्ड डॉन बनण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉनवर लिहलेल्या पुस्तकांचं वापर गुन्हेगार करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

नाशिकमध्ये घडलेल्या काही गुन्ह्यांचा तपास करत असताना ही धक्कादायक माहिती पोलीसांसमोर आली.

 

नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यात टोळीयुद्ध, हत्या, चोरी अशा प्रकारचे काही गुन्हे घडले होते.

 

या प्रकरणी नाशिक पोलिसांनी काही संशयीत आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करत असताना ही माहिती सामोर आली.

 

आता या  नाशिकच्या गुन्हेगारांना अंडरवर्ल्ड डॉन होण्यापासून नाशिक पोलीस कसे थांबवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Exit mobile version