नाशिकच्या टाकसाळीतून ५ लाख रुपयांच्या नोटा गायब

नाशिक: नाशिकमधील टाकसाळीमधून पाच लाखांच्या नोटा गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टाकसाळीमधून नोटा गायब झाल्यानं खळबळ उडाली असून या प्रकरणी गोपनीयरित्या चौकशी सुरू आहे.
दोन आठवड्यापूर्वी ही घटना उघड झाली. मात्र याबाबत अद्याप पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंद झालेला नाही. गुन्हा नोंद करण्यासाठी मुद्रणालयातील अधिकाऱ्यांची मध्यरात्रीपर्यंत धावपळ सुरू होती.
कडक सुरक्षाव्यवस्था असूनसुद्धा टाकसाळीमधून पाच लाखांच्या नोटा गायब कशा होऊ शकतात , असा प्रश्न तेथील व्यवस्थापनाला पडला आहे.