Fri. Apr 19th, 2019

जेट एअरवेजची नाशिक-दिल्ली विमानसेवा अनिश्चित काळासाठी बंद

10Shares

जेट एअरवेजने वर्षभरापूर्वी नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू केली होती. मात्र जेट एअरवेजने ही विमानसेवा अनिश्चित काळासाठी बंद केली असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जेट एअरवेज कंपनी आर्थिक संकटात आहेत. आर्थिक संकटात असल्यामुळे ही बंद केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

जेट एअरवेजने वर्षभरापूर्वी नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू केली.

जेट एअरवेजने ही सेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू केली होती.

आठवड्यातील सोमवार, बुधवार आणि शुक्रवार रोजी ही विमान उपलब्ध होती.

तसेच नाशिकरांनी या सेवेला चांगला प्रतिसाद दिला होता.

मात्र काही महिन्यांपासून जेट एअरवेज आर्थिक संकटात आहे.

त्यामुळे ही सेवा बंद करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ही सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली असल्याचे समजते आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *