Jaimaharashtra news

म्हणून शेतकऱ्यांनी शेतातच गळफास बांधून ठेवलेत

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावरुन नाशिकच्या शिवडे गावातले शेतकरी आक्रमक झाले आहेत.

 

समृद्धी महामार्गासाठी जमिन मोजण्याच्या कामासाठी प्रशासनाचे अधिकारी गावात आले तर गळफास घेणार असा आक्रमक पवित्रा इथल्या शेतकऱ्यांनी घेतला.

 

त्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात फाशी घेण्यासाठी झाडाला दोरखंडाचे फास टांगून ठेवलेत.

 

समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असून शिवडे गावात जमीन मोजण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी येणार आहेत.

 

या महामार्गामुळे आमची जमिन बळकावण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोप इथल्या शेतकऱ्यांनी केला.

 

त्यामुळे या महामार्गाला गावकऱ्यांचा विरोध कायम आहे.  

 

याआधीही सिन्नर तालुक्यात गावांमध्ये जमिन मोजणीला आलेल्या अधिकाऱ्यांना तिथल्या शेतकऱ्यांनी पिटाळून लावले होते.

Exit mobile version