Fri. Jan 21st, 2022

हत्येच्या घटनांनी हादरले नाशिक

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

मैत्रीमध्ये जीव ओवाळून टाकणारे मित्र नेहमीच पाहायला मिळतात. पण नाशिकमधील ही घटना ऐकून तुमच्या पायाखालची जमीन हादरुन

जाईल. नाशिकच्या भद्रकाली परिसरात मित्रानेच आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

 

संपत कडाळे याची त्याच्याच मित्रांनी हत्या केली आहे. रविवारी रात्री संपत आणि त्याचे काही मित्र मद्यपान करण्यास एकत्र बसले होते.

त्यावेळी त्यांच्यात वाद निर्माण झाले. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि त्यात संपतचा दुर्देवी मृत्यू झाला.  

 

तर दुसरीकडे सातपुर परिसरात धनराज परदेशी नावाच्या तरुणाची त्याच्याच मित्राने भोसकून हत्या केली आहे.

ऐन सणासुदीच्या काळात नाशिक शहरात घडलेल्या या घटनांमुळे नाशिकमध्ये भितीचे  वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *