Tue. Aug 20th, 2019

हळदीच्या पूर्वसंध्येला नवरदेवाची आत्महत्या

0Shares

घरामध्ये विवाहसोहळा आहे. कुटुंबीय नातलगांची सरबराई करण्यात व्यस्त आहेत. मुलीच्या घरी तिच्या मैत्रिणी जमल्या आहेत. हळद असल्याने सर्वांमध्ये उत्साह आहे. मात्र अशा वातावरणात जेव्हा नवऱ्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडते, तेव्हा त्या कुटुंबावर काय परिस्थिती ओढावेल, याची कल्पनाही करू शकत नाही.  मात्र नाशिकमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे.

हळद रुसली…

हळदीच्या पूर्वसंध्येला नवरदेवाने गळफास लावून स्वत: चं आयुष्य संपवल्याची भीषण घटना घडली आहे.

हा धक्कादायक प्रकार नाशिकमधल्या बळवंतनगर भागामध्ये घडला आहे.

निखिल देशमुख असं आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

शनिवारी 20 एप्रिल रोजी निखिलचा विवाह होणार होता.

लग्नाच्या आदल्या दिवशी हळदी समारंभ होणार होता.

त्याच दिवशी निखिल याने आत्महत्या करून अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

निखिलच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

आर्थिक चणचणीमुळे निखिलने हे टोकाचं पाऊल उसचलल्याचं बोललं जात आहे.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *