Wed. Jun 19th, 2019

नाशिक जव्हार रोडवर खाजगी बसचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू

28Shares

नाशिक जव्हार रोडवर तोरंगना घाटात एका खाजगी बसचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून ४५ जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी नाशिक येथील रुग्णालयात  दाखल करण्यात आले असून १०-१२ जण गंभीर जखमी झाले आहेत.  बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं ?

नाशिक जव्हार रोडवर तोरंगना घाटात खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे.

बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

बस तोगंगणा घाटात २५ फूट खोल दरीत कोसळी असून बचावकार्य सुरू आहे.

शिर्डी येथून डहाणूकडे जात असताना हा अपघात घडला.

या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून ४५ प्रवासी जखमी झाले आहेत.

तसेच १० ते १२ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

28Shares

Leave a Reply

%d bloggers like this: