Sat. Jun 12th, 2021

शेतकरी यापुढे आत्महत्या करणार नाहीत, तर बँक संचालकांचे मुडदे पडतील

 

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक 

 

शेतकरी यापुढे आत्महत्या करणार नाहीत, तर बँक संचालकांचे मुडदे पडतील. नाशिक जिल्हा बँकेविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. बँकेनं गोठवलेली 60 हजार बँक खाती पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.

 

जिल्हा बँकेत शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला. गोठवलेली खाती लवकरात लवकर मोकळी करा आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीनं कर्जवाटप करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

 

 

2 दिवसांत निर्णय न झाल्यास बँकेला टाळं ठोकू आणि 25 एप्रिललला बँकेला घेराव घालू, तसंच संचालकांना बँकेची पायरी चढू देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी नाशिक जिल्हा बँकेला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *