नाशिमध्ये पोहोचला ‘लालबागचा राजा’
जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
गणेशउत्सवात मुंबईला जाऊन लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याची इच्छा अनेक भाविकांची असते, पण काही कारणांमुळे नागरिकांची ही
इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. अशा भाविकांसाठी आता चक्क लालबागचा राजा नाशिकमध्ये अवतरला आहे.
नाशिकच्या गणेशभक्तांना लालबाग राजाचं दर्शन घेता यावे या हेतूने नीशिकमध्ये ‘नाशिकचा राजा’ या गणेश उत्सव मंडळाकडून गेल्या 12
वर्षांपासून लालबाग राजाची प्रतिकृती म्हणजेच नाशिकच्या राजाची प्रतिष्ठापणा करण्यात येते.
महाराष्ट्रात ख्याती असलेल्या लालबागच्या राजाची हूबेहूब प्रतिकृती नाशिकमध्ये साकारली आहे. त्यामुळे येथील गणेश भक्तांना लालबागच्या
राजाचे दर्शन घेता येणार आहे.