Wed. May 19th, 2021

मालेगावात आग, बालकाचा मृत्यू

नाशिक : मालेगावात आग लागल्याची घटना घडली आहे. आज(मंगळवार) दुपारी ही घटना घडली. या आगीत अडीच वर्षाच्या चिमुरड्याचा दु्र्देवी मृत्यू झाला आहे. तर मृत बालकाचे आई वडील गंभीर जखमी झाले आहे..

जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. आगीत मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे हसान मोहम्मद मुबिन असे नाव आहे.

मालेगाव शहरातील अय्युब नगरमध्ये ही आग लागली. या आगीत 5-6 झोपड्यांना आग लागली. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील झाले आहे.

अग्निशमन दलाच्या 4 बंबांच्या मदतीने सुमारे एका तासाने आग विझवण्यास यश आले. अरुंद चाळीत आग लागल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवताना चांगलीच दमछाक झाली. मात्र आगीचे कारण अद्यापही समजून शकलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *