Mon. Jan 17th, 2022

‘नाशिक महापालिका दहा हजार किट खरेदी करणार’

राज्यात ओमायक्रोनने पाय पसरायला सुरुवात केल्यामुळे नाशिक प्रशासन सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर ओमायक्रोनची चाचणी नाशकातच करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी नाशिक महापालिका दहा हजार किट खरेदी करणार असल्याची माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे.

ओमायक्रोनचे सावट हे नाशिकवर देखील येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पुण्यातील प्रयोगशाळेत ओमायक्रोन विषाणूचा अहवाल तपासणीसाठी पाठविला जातो. मात्र अहवाल येण्यासाठी आठ ते दहा दिवसाचा कालावधी लागतो. मात्र या कालावधीत ओमायक्रॉन विषाणू पसरण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे नाशिकमध्येच ही चाचणी करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले आहे.

दरम्यान आता महापालिका आरटीपीसार चाचणीसाठी लागणारे साहित्य घेणार आहे. यात दोन प्रकारचे किट असून यामध्ये तीन जीनचे किट ६० ते ७० रुपयाला मिळतात. तर चार जीनचे तपासणी किट २५० रुपयांपर्यंत मिळतात. त्याप्रमाणे शहर आणि ग्रामीणमध्ये १० हजार किट महापालिका घेणार आहे. या माध्यमातून संशयित रुग्ण आणि परदेशी नागरिक, त्यांच्या संपर्कातील नागरिक यांची तपासणी चार जीनच्या किटद्वारे होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *