राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला महावितरणाचा शॉक
जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या बॉटेनिकल गार्डनने सत्ताबदल होताच मान टाकली आहे.
आकर्षणाचं केंद्रबिंदू असलेल्या बॉटेनिकल गार्डनचा लेझर शो अनेक दिवसांपासुन बंद असल्याने पर्यटकांचा हिरमोड होतो आहे.
हाय वोल्टेजमुळे येथील लेझर शो साठी वापरण्यात येणारे दिवेच उडाल्याने हा शो अनिश्चित काळापर्यंत बंद ठेवण्यात आला आहे.
अत्यंत उच्च दर्जाचं तंत्रज्ञान वापरण्यात आल्याने आशियातील सर्वात महागडा आणि आकर्षक लेझर शो म्हणुन याचा नावलौकिक होता.
मात्र, वीजवितरण विभागाच्या अनिश्चित वीजपुरवठ्यामुळे या लेझर शोसाठी वापरण्यात येणारे सुमारे दिडशे ते दोनशे महागडे लाइट जळाले आहेत.
या लाइट रिपेअरिंगचं काम सुरु असलं तरी याचा खर्च आणि याचं तंत्रज्ञान महाग असल्यानं हा शो अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आल्याचा मनसे पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे.