Thu. Sep 29th, 2022

नाशिककरांना गुलाबी थंडीची चाहुल

राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा चांगलाच जाणवत आहे. मात्र अशातच नाशिककरांना गुलाबी थंडीची चाहुल लागली आहे. नाशिकमधील पारा १४.०६ अंशावर घसरला असून नाशिककरांना महाबळेश्वरासारखी थंडी जाणवत आहे. राज्यात उष्मा वाढल्यामुळे विजेची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र नाशिककर आता गुलाबी थंडीचा आस्वाद घेत आहेत.

नाशिकमध्ये हिवाळी दिवसांना सुरुवात झाली आहे. गुलाबी थंडीची चाहुल नागरिकांचे मन प्रसन्न करत आहे. उन्हाळी दिवसांत मॉर्निंग वॉकला जाणे नागरिकांना फारसे आवडत नाही. मात्र नाशिकमध्ये सकाळच्या सुमारास प्रचंड गारवा असल्यामुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नाशिककरांमद्ये चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. थंडीच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांनी आपली स्वेटर्स, मफलर वापरण्यासाठी बाहेर काढली तर अनेक ठिकाणी शेकोट्याही पेटलेल्या दिसत आहेत.

राज्यात उष्मा वाढत चालल्यामुळे विजेची मागणी जोर धरू लागली आहे. अशातच नाशिककर थंडीचा आस्वाद घेत आहे. ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून नाशिककर थंडीचा आस्वाद घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.